Follow Us On

Sunday, February 15, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeक्राइमसावधान वणीकरांनो! वणी शहरात 500 रुपयांच्या नकली नोटांचा सुळसुळाट; ॲक्सिस बँकेच्या एटीएममधून...

    सावधान वणीकरांनो! वणी शहरात 500 रुपयांच्या नकली नोटांचा सुळसुळाट; ॲक्सिस बँकेच्या एटीएममधून नकली नोट आढळली!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    वणी शहराच्या बाजारपेठेमध्ये 500 रुपयांच्या नकली नोटांचा सुळसुळाट होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून, आज घडलेल्या एका घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. थेट बँकेच्या एटीएममधून नकली नोट निघाल्याने आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

    वागदरा येथील रहिवासी दीपक शंकरराव येडलावार यांनी आज ॲक्सिस बँकेच्या एटीएममधून 5,000 रुपये काढले. त्यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असून एटीएममधून त्यांना 500 रुपयांच्या दहा नोटा मिळाल्या. मात्र नोटा तपासल्यानंतर त्यातील एक नोट संशयास्पद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या नोटीची लांबी, रुंदी व छपाई इतर नोटांपेक्षा वेगळी दिसत होती.

     

    याबाबत दीपक येडलावार यांनी तत्काळ ॲक्सिस बँकेत चौकशी केली. बँकेकडून तपासणी केल्यानंतर संबंधित नोट नकली असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब लक्षात येताच बँकेने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तसेच दीपक येडलावार यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन त्यांच्या तक्रारीची नोंद उच्च पातळीवर पाठवण्यात आली.

    बँकेकडून त्यांना असे आश्वासन देण्यात आले आहे की, दोन ते तीन दिवसांत निर्णय घेऊन संबंधित 500 रुपये परत दिले जातील किंवा त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. सध्या ती नकली नोट बँकेकडे जमा करण्यात आली आहे.

    या प्रकरणानंतर आणखी गंभीर बाब समोर आली असून, ॲक्सिस बँकेत उपस्थित प्रतिनिधीला यावेळी आणखी दोन नकली 500 रुपयांच्या नोटा दाखवण्यात आल्या, ज्यावर ‘Fake’ असा शिक्का मारलेला होता. त्यामुळे वणी शहरात नकली नोटांचा प्रश्न किती खोलवर रुजलेला आहे, याबाबत शंका निर्माण होत आहे.

    बँक व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, एटीएममध्ये नोटा भरण्याची जबाबदारी बँकेची नसून, ती कंत्राटी कंपनीकडे असते, जी एटीएमचे संपूर्ण हँडलिंग करते. संबंधित कंपनीमार्फतच नोटा एटीएममध्ये भरल्या जातात, अशी माहिती ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापक मंडळाने दिली.

    नोटबंदीनंतर अशा प्रकारांमध्ये घट झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा बाजारात नकली नोटा आढळू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा घटना वाढल्यास सामान्य जनतेवर आर्थिक व मानसिक दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    त्यामुळे वणीकर नागरिकांनी विशेषतः दुकानदारांनी व्यवहार करताना नोटा नीट तपासून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या गंभीर प्रकरणाची पोलीस व प्रशासनाने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

    दीपक येडलावार यांच्यासोबत घडलेली घटना इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये, यासाठी सर्वांनी सावध राहणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Video thumbnail
    गावातील लोकं शिवलिंगावर कपडे धुवत होती मग काय घडलं,बघा या विडियो मध्ये...
    08:54
    Video thumbnail
    भालर येथील शेतकरी व रॉकवेल मिनरल्स कंपनी आमनेसामने,कंपनीच्या प्रदूषणामुळे नुकसान भरपाई ची मागणी...
    13:01
    Video thumbnail
    स्पेशल झुनका भाकर.#food #foodie ##strrefoods #indianfood #foodlover
    02:00
    Video thumbnail
    फिर याद आया वो गुजरा जमाना, वो भी क्या दिन थे।
    19:21
    Video thumbnail
    नगरपालिका के बगल में शौचालय,लेकिन नागरिक खुले में जाने को मजबूर।
    01:59
    Video thumbnail
    हरिपाठ करत निघाली वरात...
    01:00
    Video thumbnail
    बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी किरण नांदेकर यांची राजकारणात एंट्री...
    02:39
    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए