सिटी हब मिडिया वणी…
वणीत रंगणार ‘नाथ केसरी’ भव्य शंकरपट; ४ लाख ५३ हजारांची बक्षीसे आणि मान्यवरांची मांदियाळी!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून आणि माजी आमदार स्व. श्री. विश्वासभाऊ नांदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, वणी विधानसभा क्षेत्रात ‘नाथ केसरी’ भव्य इनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. २०, २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुकुटबन रोडवरील साईलीला नगरीच्या बाजूला, देवराव काकडे यांच्या शेतात हा थरार रंगणार आहे.

बक्षिसांचा पाऊस: ४ लाख ५३ हजारांची लयलूट
या शंकरपटात तीन गटांत स्पर्धा होणार असून एकूण ४ लाख ५३ हजार रुपयांची भव्य बक्षिसे दिली जाणार आहेत.
‘अ’ गट: प्रथम बक्षीस १,००,००१/- रुपये.
‘ब’ गट: प्रथम बक्षीस ५१,००१/- रुपये.
‘क’ गट (गावगाडा): प्रथम बक्षीस १५,००१/- रुपये.
याव्यतिरिक्त प्रत्येक गटात सातव्या क्रमांकापर्यंत आकर्षक रोख बक्षिसे आणि मानचिन्हे देण्यात येणार आहेत. तसेच, तिन्ही गटांतून सर्वात कमी वेळेत धावणाऱ्या बैलजोडीला विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात येईल.

उद्घाटन आणि प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याचे उद्घाटन शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार श्री. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराज भैय्या अहीर भूषविणार आहेत.
यावेळी वणी-झरी-मारेगाव परिसरातील अनेक दिग्गज राजकीय नेते, समाजसेवक आणि विशेष निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. आयोजनाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती किरणताई विश्वास नांदेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारली आहे.
स्पर्धेचे नियम आणि वैशिष्ट्ये
बिनकाठी खेळ: स्पर्धेत काठी किंवा टोचणीचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.
पारदर्शक नियोजन: वेळेच्या अचूक नोंदीसाठी ‘वायरलेस घड्याळाचा’ (शामभाऊ राठोड) वापर केला जाणार आहे.
नोंदणी: स्पर्धकांना गटांनुसार ठराविक प्रवेश शुल्क भरून नाव नोंदणी करावी लागेल.
आयोजकांचे आवाहन: “शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या शंकरपटात जास्तीत जास्त बैलजोडी मालकांनी सहभाग नोंदवावा आणि क्रीडाप्रेमींनी या थराराचा आनंद घ्यावा,” असे आवाहन किरणताई नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली उमेश वैरागडे,शिवराज पेचे,विक्रांत चचडा,धीरज राजूरकर ,अनिल उलमाले, समस्त सहकारी व आयोजन समितीने केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
उमेशभाऊ वैरागडे: ९१३०१८७००१,
संजयभाऊ आवारी: ९७२१०९१७७९

























