वणीतील प्रसिद्ध व्यवसायिक गिरीश राठी आणि भाजप व्यापारी आघाडी चे अध्यक्ष अनूप राठी यांच्या मातोश्री श्रीमती उषादेवी रामगोपालजी राठी (वय ७२) यांचे आज दिनांक १ मार्च २०२६, रविवार रोजी निधन झाले आहे. त्यांनी आपली सांसारिक यात्रा संपवून ईश्वराच्या चरणी विश्रांती घेतली आहे.
श्रीमती उषादेवी राठी यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्या भाजप व्यापारी आघाडी, वणीचे अध्यक्ष अनुप राठी आणि प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश राठी यांच्या मातोश्री होत.
अंतिम यात्रा: आज रविवार, दिनांक १.३.२०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता त्यांच्या ‘राठी निवास’, वणी येथून मोक्षधामाकडे निघेल.
सिटी हब मिडिया वणी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 🙏 🙏.

























