Follow Us On

Tuesday, March 10, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रमराठी शाळा वाचवण्यासाठी १७ मार्चला यवतमाळमध्ये एआयएसएफ चा महाएल्गार मोर्चा; पालक-विद्यार्थ्यांना सहभागी...

    मराठी शाळा वाचवण्यासाठी १७ मार्चला यवतमाळमध्ये एआयएसएफ चा महाएल्गार मोर्चा; पालक-विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    राज्यात कमी पटसंख्या असल्याचे कारण देत अनेक मराठी शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) ने या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ येथे मोठ्या एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

    हा मोर्चा यवतमाळ येथील श्रमशक्ती भवन येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असून, शासनाच्या शिक्षण धोरणाविरोधात निवेदन सादर करण्यात येणार आहे. मराठी शाळा टिकवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती संघटनेने दिली.

    संघटनेच्या म्हणण्यानुसार, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, शिक्षकांची संख्या केवळ पटावर आधारित निश्चित करण्याचे धोरण मागे घ्यावे आणि दत्तक शाळा योजनेद्वारे होणारे शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे, अशा प्रमुख मागण्या या आंदोलनातून मांडल्या जाणार आहेत.

    तसेच राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी, शिक्षकांना अध्यापनाशिवाय इतर कामांमध्ये गुंतवू नये, शाळांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक, इंटरनेट, खेळाचे साहित्य आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा करावी, अशा मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला आहे.

    याशिवाय शिक्षण क्षेत्रावर सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या किमान ६ टक्के निधी खर्च करण्याची मागणी करण्यात आली असून, शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषय सक्तीने लागू करू नये तसेच नरेंद्र जाधव समिती रद्द करावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे. केरळ राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

    या मोर्चात मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ. अथर्व निवडिंग (राज्य कौन्सिल सदस्य), अयान शाह (जिल्हा समन्वयक), अभिजित नगराळे, रोशनी कांबळे, पियुष सोनुले, अनुष्का आत्राम, भुवनेश्वरी चामाटे, प्रेम ठेंगणे, कृष्णा यनगंदेवार, भुषण गणविर आदी एआयएसएफ पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Video thumbnail
    जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
    00:50
    Video thumbnail
    योग मुळे आता सर्व शक्य आहे, ना रोग ना टेंशन आता फक्त आनंद आणि उत्साह...
    15:48
    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Video thumbnail
    गावातील लोकं शिवलिंगावर कपडे धुवत होती मग काय घडलं,बघा या विडियो मध्ये...
    08:54
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए