सिटी हब मिडिया वणी…
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका २० वर्षीय तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी मारेगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत जितेंद्र बुरांडे (वय २५ वर्षे, रा. ब्राह्मणी, वणी) याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले होते. १५ ऑक्टोबर २०२४ पासून ते २४ मार्च २०२६ या कालावधीत त्याने वणी येथील एका हॉटेलवर नेऊन तरुणीवर सात ते आठ वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
फसवणूक उघडकीस…
२४ मार्च रोजी पीडित तरुणीने आरोपीला लग्नाबद्दल विचारणा केली असता, त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने वणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिस कारवाई…
तरुणीच्या जबानी रिपोर्टवरून वणी पोलिसांनी आरोपी संकेत बुरांडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रियंका चौधरी करत आहेत.

























