Homeमहाराष्ट्रवणीत गॅस सिलेंडरचा 'कृत्रिम' तुटवडा???शिवसेना (उबाठा) आक्रमक, प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम!

वणीत गॅस सिलेंडरचा ‘कृत्रिम’ तुटवडा???शिवसेना (उबाठा) आक्रमक, प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत,सिटी हब मिडिया वणी…

शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा भासत असून, हा प्रकार नैसर्गिक नसून ‘कृत्रिम’ असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. या गंभीर प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेत थेट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दारात धडक दिली. “७ दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलन छेडू,” असा स्पष्ट इशारा शिवसेनेने प्रशासनाला दिला आहे.

नेमका प्रश्न काय?

वणी शहरात एच.पी. आणि इंडियन गॅसच्या वितरकांकडून ग्राहकांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शिवसेनेच्या निवेदनानुसार:

काळाबाजार: सिलेंडरची साठेबाजी करून ते चढ्या दराने विकले जात आहेत.

वितरण ठप्प: हक्काची ‘होम डिलिव्हरी’ बंद असल्याने सर्वसामान्यांना पायपीट करावी लागत आहे.

आर्थिक लूट: टंचाईचे कारण सांगून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे उकळले जात आहेत.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:

१. गॅस सिलेंडरचा काळाबाजार तात्काळ रोखण्यात यावा.

२. विस्कळीत झालेली घरपोच सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करावी.

३. नियमबाह्य काम करणाऱ्या आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या वितरकांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.

सोशल मीडियावरून जनरेटा…

या आंदोलनात वणी विधानसभा सोशल मीडिया प्रमुख साकेत अविनाश भुजबलराव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी डिजिटल माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींना वाचा फोडत प्रशासनावर दबाव निर्माण केला. आमदार संजय भाऊ देरकर आणि जिल्हाप्रमुख संजय भाऊ निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले…

उपस्थित पदाधिकारी…

निवेदन देतेवेळी शहर सचिव अजय चन्ने, उपशहर प्रमुख राजू पाटील, शहर संघटक मनीष बत्रा, नगरपरिषदेचे गटनेते सुधीर थेरे, नगरसेवक अनिकेत बदखल, शत्रुघन मालेकर, तुलसी तोवर यांच्यासह युवासेना व शिवसेनेचे असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील पाऊल काय असेल?

दिलेली ७ दिवसांची मुदत संपल्यानंतरही जर सिलेंडर वितरण सुरळीत झाले नाही, तर वणी शहरात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Video thumbnail
‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
05:27
Video thumbnail
श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
00:51
Video thumbnail
जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
00:56
Video thumbnail
सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
06:03
Video thumbnail
वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
03:30
Video thumbnail
जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
07:10
Video thumbnail
भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
04:51
Video thumbnail
श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
01:54:59
Video thumbnail
City Hub Media is live
07:16
Video thumbnail
"वणी की विरासत और हंसी का संगम"।
51:03
Video thumbnail
“हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
32:08
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए