नंदीग्राम एक्स्प्रेस च्या धडकेत युवकाचा मृत्यू,आत्महत्या केल्याचा संशय…
मुंबई बल्लारपूर नंदीग्राम एक्स्प्रेस च्या धडकेत युवकाचा कटून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ घडली.
घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत,हा युवक स्वतः रेल्वेखाली आला की त्याला धडक बसली याचा तपास सुरू आहे व धडकेने युवकाच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते व त्याचे शव
पोस्टमार्टम साठी ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले आहे…
मृत युवकाचे नाव शिवबालक पटेल सांगण्यात येत आहे ,तो एका बिअर बार मध्ये वेटर म्हणून काम करत होता अशी माहिती आहे, मृतकाचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे असून त्याने पिवळ्या रंगाची टीशर्ट व काळा बर्मुडा घातला होता…
या घटनेनंतर नंदीग्राम एक्स्प्रेस अर्धा ते एक तास थांबून होती व नांदेपेरा रोड जवळील रेल्वे क्रॉसिंग वर वाहतूक व्यवस्थेची कोंडी झाली होती कारण रेल्वे गेट बंद होता जो नंदीग्राम एक्स्प्रेस निघाल्यावर उघडण्यात आला…
वणी पोलिस समोरील तपास करीत आहेत…

























