दिपक चौपाटी परिसरात एका मच्छी विक्रेत्याला त्याचा निष्काळजीपणा भोवला,चोरट्याने दुचाकी केली लंपास…
सविस्तर माहिती अशी की २० जुलै ला भोईपुरा येथील रहिवासी मारोती अर्जुन भानारकर (वय ६२) रोज प्रमाणे दिपक चौपाटी परिसरातील मच्छी बाजारात मच्छी विक्री साठी आपल्या हिरो स्प्लेंडर क्र. अंदाजे किंमत ७० हजार(MH-29CC-1367)ने आले व गाडी चावी न काढता रस्त्याजवळ उभी केली आणि आपल्या कामाला लागले.
यावेळीच चावी न काढण्याचा निष्काळजीपणा मारोती भानारकर यांना भोवला व अज्ञात इसमाने त्यांची दुचाकी लंपास केली ही घटना रात्री ८.३० घडली….
भानारकर यांनी त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला नंतर त्यांनी वणी पोलिस स्टेशन गाठले व दुचाकी चोरीची तक्रार नोंदवली…


पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे…
पोलिस नागरिकांना वारंवार सावध राहण्याच्या सूचना देत आहे परंतु काही वेळा नागरिक निष्काळजीपणा करतात व त्याचे खापर पोलिसांवर फोडतात…
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की गाडी पार्क करताना शक्यतो सीसीटीव्ही च्या नजरेत राहिल अशी पार्क करावी व काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे…

























