Homeमनोरंजननारीशक्तीचा जागर: वणीत सुतार समाज महिला मंचतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न!

नारीशक्तीचा जागर: वणीत सुतार समाज महिला मंचतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

‘मम्मी स्पेशल’ सांस्कृतिक स्पर्धांनी जिंकली उपस्थितांची मने; कर्तबगार महिलांचा गौरव…

“स्त्री हीच खऱ्या अर्थाने समाजाचा कणा आहे,” हा संदेश अधोरेखित करत सुतार समाज महिला मंच, वणी च्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवार, १० मार्च रोजी स्थानिक सुतारपुरा येथील महादेव मंदिर परिसरात आयोजित या सोहळ्यात महिलांचा सत्कार, प्रबोधनपर व्याख्यान आणि बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पाहायला मिळाली.

मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन…

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा वंदनाताई पुरुषोत्तम आवारी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्य क्षेत्रीय अधिकारी (TDRF) कु. मुस्कान ज. सैय्यद यांची उपस्थिती लाभली.

यावेळी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या “स्वयंप्रतिकारक रोगाशी लढताना” या विषयावर वैद्य सुवर्णा चरपे (श्री विश्व योग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र) यांनी मार्गदर्शन केले. धावपळीच्या जीवनात महिलांनी स्वतःच्या प्रकृतीकडे कसे लक्ष द्यावे, याचे मोलाचे सल्ले त्यांनी यावेळी दिले.

कर्तबगार महिलांचा सन्मान…

समाजातील विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये माथोली गट ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. कु. प्रतीक्षा अरुण देऊळकर, नगरसेविका आरतीताई गिरीश वांढरे आणि अर्चनाताई शंकरराव झिलपे यांच्यासह समाजातील इतर कर्तबगार महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

‘मम्मी स्पेशल’ ठरले आकर्षणाचे केंद्र…

दुपारच्या सत्रात स्नेहभोजनानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत वाढली. विशेषतः “मम्मी स्पेशल” या संकल्पनेवर आधारित नृत्य व वेशभूषा स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. समाजातील महिलांनी एकल नृत्य, सामूहिक नृत्य आणि नाटिकांमधून आपल्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडवत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन संगीता लांडे यांनी केले.

नियोजनासाठी मंचाचा पुढाकार…

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सुतार समाज महिला मंचच्या अध्यक्षा मंगलाताई प. झिलपे, उपाध्यक्ष शारदाताई वि. झिलपे, सचिव जयश्रीताई धि. अंड्रस्कर, कोषाध्यक्ष संगीताताई न. मुरस्कर, कार्याध्यक्ष संगीताताई ह. झिलपे, आणि सहसचिव पुष्पाताई सं. वनकर यांनी पुढाकार घेतला.

यासोबतच संध्या झिलपे, रत्नाताई अंड्रस्कर, शिवाणी बुरडकर, वेणुताई झोडे, पुनमताई झिलपे, प्राचीताई नवघरे, मिनाताई झिलपे, संगिताताई राखुंडे, बेबीताई साखरकर, सोनिका साखरकर, प्रिया झिलपे, शुभांगी निवलकर, कोमल झिलपे, तेजस्वीनी राखुंडे, नाजुका राखंडे, सोनाली झिलपे, किरण बुरडकर, आचल वांढरे, कविता अंड्रस्कर, उषाताई झिलपे, दुर्गा झिलपे, खुशबु झिलपे, ज्योती झिलपे, कविता झिलपे, शालीनी झिलपे, वर्षा झिलपे, प्रतिभा मुरस्कर आणि प्रेमिला निवलकर यांच्यासह समाजातील असंख्य महिलांनी परिश्रम घेतले.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए