Homeमहाराष्ट्रबापाच्या स्वभावात असणाऱ्या महापुरुषांच्या गुणांचे दर्शन कवी डॉ. विनोद‌कुमार आदे यांच्या लेखणीतून...

बापाच्या स्वभावात असणाऱ्या महापुरुषांच्या गुणांचे दर्शन कवी डॉ. विनोद‌कुमार आदे यांच्या लेखणीतून अवतरले – दत्ता डोहे!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

दिनांक 28 फेब्रुवारीवारीला शेतकरी मंदिर येथे डॉ. विनोदकुमार आदे यांच्या द्वितीय आवृत्ती “बाप” या कवितासंग्रहाचे दिगजांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याकरिता अभिनेते तथा सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांची उपस्थिती होती. 

 

डॉ. विनोदकुमार आदे हे मल्टी टॅलेंटेड असल्याने मुखपृष्ठ व पुस्तकाच्या आतील रेखाचित्रे आणि ग्राफिक्स पासून टायपिंग पर्यंतचे सर्व काम त्यांनी स्वतः पाहिले. भूमिपुत्र ज्येष्ठ साहित्यिक, तरुण भारत चे मुख्य संपादक शैलेश पांडे यांनी बापाच्या त्यागाला ‘पुरस्कार’ देऊन पुस्तकाच्या ब्लर्बला जिवंतरूप प्रदान केले.

 

‘आई’ किंवा ‘माय’ या विषयावर अनेक कवितासंग्रह आलेत. कथासंग्रह आले. ‘आई समजून घेताना’ ही ज्येष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे यांची साहित्यकृती, मॅक्झिम गाॅर्की यांची ‘आई’ नावाची कादंबरी जगभर गाजली, असंख्य कविनी ‘आई’ या विषयावर कविता लिहल्या.

‘हंबरून वासराले चाटते जवा गाय’ ही ‘माय’ वर लिहिलेली अनामिक कविता फार लोकप्रिय झाली. काळी आई म्हणून सुद्धा अनेक कवींनी कविता लिहल्या. तुलनेमध्ये कवी, साहित्यिकांनी ‘बाप’ या विषयाला उपेक्षित ठेवलं. त्याची कारणेही तशीच आहे.

 

‘बाप म्हणजे आभाक’ एखाद्याचा बाप गेला तर आपण आभाळ कोसळलं असं म्हणतो. बापाच्या अंगी अनेक कला असते, अनेक गुण असते. भावनिकता, धाडस, सहकार्य, हिम्मत, अशा अनेक गुणांचा संग्रह म्हणजे बाप! या बाप या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांची ‘आमचा बाप आणि आम्ही’ हे अतिशय गाजलेले आत्मकथन आहे. काही कविता संग्रह ‘बाप’ या विषयावर आहे. असेच एक धाडस आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे कवी, साहित्यिक डॉ. विनोद‌कुमार आदे यांनी करून ‘बाप’ नावाचा कविता संग्रह प्रकाशित करण्याचा प्रयोग केला आहे.

 

आज वाचक नाही, ही फार मोठी अंधश्रध्दा समाजामध्ये निर्माण केली आहे. ही अंधश्रद्धा साहित्यातील मक्तेदारांनी जाणीव पूर्वक पसरविली आहे. त्याचे कारण आहे. त्यावर न बोलता आपण डॉ. विनोदकुमार आदे यांचा ‘बाप’ समजून घेऊ. बाप म्हणजे एक व्यक्ती नाही बाप म्हणजे अख्खा संसार! “सरलं पाय, पुरल पाय, घरातील सर्वांच्या तब्बेती पाय, शेती व्यवहार पाय” वडिलोपार्जित गरिबीला छेद देत संसार सांभाळण्याचे कसबीचा ब्रॅंड ॲम्बेसिडर म्हणजे बाप.

विदर्भ ही ऐतिहासिक भूमी, कलेची भूमी, क्रांतिकारकांची भूमी, बुद्धाच्या क्रांतीची मशाल विदर्भातच तैव्हली. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म विदर्भातच झाला. या विदर्भाच्या भूमीमध्ये अनेक कलंदर हरहुन्नरी लोक आहे. या सर्व कलंदरातील एक बहुआयामी नाव डॉ. विनोद‌कुमार आदे आहे.

 

डॉ. विनोद‌कुमार आदे यांचा बाप’ नावाचा कविता संग्रह म्हणजे सर्व बापाचे प्रतिनिधित्व आहे. या कवितांमध्ये मला माझ्या बापाचे आयुष्य प्रतिबिंबित झाले. आज अनेक लोक अपयश येण्यामागे गरिबी हेच कारण सांगतात. मात्र गरिबी काय असते हे वर्णन करून सांगणे शक्य नाही ती अनुभवावीच लागते. डॉ. विनोदकुमार आदे आणि भावंडाने ती अनुभवली.

 

“वाटते तान्हुले खाईल बापाला

 पण दारिद्र्य आड येते 

दिवस रात्र काबाडकष्ट करून 

स्वप्नातही चटणी भाकर येते”

 

ही अतिशयोक्ती नाही. सत्यता आहे, सत्यता! हातात भाकर मिळावी म्हणून कष्ट उपसाणाऱ्याला फक्त स्वप्नातच चटणी भाकर दिसते.

 कबिराच्या आयुष्यातील एक घटना आहे. एकदा कबीर आपल्या मुलगा कमाल यांच्यासोबत रस्त्याने चालत असते. त्या रस्त्यावर कबिराला सोनसाखळी दिसते. कबीर त्या सोनसाखळीवर माती लोटतात. कारण आपल्या मुलाला कमालाला ती दिसू नये. मेहनतीशिवाय काहीही नको. ही संतांची शिकवण डॉ. विनोद‌कुमार यांच्या कवितेमध्ये मला दिसत आहे.

 

“अक्षर गिरवणं शिकविलं 

साहेबावानी राहाणं शिकविलं

आधार देणं शिकविलं 

अन्यायाशी लढणं शिकविलं”

 

हा स्वाभिमान शिकविण्यासाठी बापचं पाहिजे.

आपण सर्वांनी हा कविता संग्रह विकत घेऊन वाचावा. कारण या कवितेमध्ये करुणा शिकविणारे बुद्ध आहे. कष्ट शिकविणारे कबीर आहे. निसर्गाशी नाते सांगणारे तुकोबा आहे. पराक्रमाचा आदर्श, स्वराज्य निर्माते शिवराय आहे. तरुणांमध्ये आदर्श निर्माण करणारे शंभूराजे, भगतसिंग आहे. गुलामीची जाणीव करून देणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे. बापाच्या स्वभावात असणाऱ्या महापुरुषांच्या गुणांचे दर्शन कवी डॉ. विनोद‌कुमार आदे यांच्या लेखणीतून अवतरले आहे.

 

शेवटी बापाची तिरडी (ताठी) बांधतांना ढाळलेल्या अश्रूची आर्तता कविनी कागदावर उमटविली आहे.

 

“बापाचं मढ बांधिते 

गया गाऊ गाऊ रडते

जन्म देणाऱ्या त्या बापाला 

मी दंडवत अखेरचा करते”

 

या कष्टाच्या आर्ततेतून निघालेल्या दुःखाच्या अश्रूला माझा क्रांतिकारी सलाम.

 

“जय ज्योती, जय क्रांती, जय जिजाऊ, जय भीम”

 

दत्ता डोहे

प्रकाशक, स्वराज पब्लिकेशन वणी… 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए