वणी – मुकुटबन मार्गावरील सैदाबाद फाट्याजवळ आज सकाळी अंदाजे ८:३० वाजताच्या सुमारास सिमेंटनेभरलेला ट्रक पलटी झाल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली.
सदर अपघातात ट्रक (क्रमांक RJ 57-GA 0195) पूर्ण रस्त्यावर उलटल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांबरांगा लागल्या आहेत. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांना मोठा मनस्ताप सहनकरावा लागत आहे.
वाहतूक ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांपासून शिक्षक, शेतकरी, नोकरी करणारे कर्मचारी यांना कामावर, शाळेतपोहोचण्यास पर्यायी मार्ग म्हणजेच साखरा (दरा) फाट्याचा वापर करावा लागत आहे.

सदर घटना घडून दोन ते तीन तास झाले तरी अपघातग्रस्त ट्रक हटविण्यासाठी अद्याप ठोस उपाययोजना झालीनसल्याचे चित्र आहे.
ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे की सदर मार्गावरील वाहतूक तत्काळ सुरळीत करण्यातयावी.

























