शहरातील काळे लेआऊट येथील पद्मावती नगरमध्ये पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडली असून, या परिसरातीलनागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच काही कामानिमित्त चंद्रपूरला गेलेले अमित पारखी हेघरी परतल्यावर त्यांना आपल्या घराचे कुलूप तुटलेले व घरफोडी झाल्याचे आढळले.
या घरफोडीत चोरीस गेलेल्या वस्तूंची अचूक किंमत सध्या तपासाच्या अधीन आहे. घटनेची माहिती मिळताच वणीपोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा व पुढील तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या एका आठवड्यात पद्मावती नगरमध्ये दोन घरफोडीच्या घटना घडल्याने परिसरातदहशतीचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त होत असून, वारंवार घडणाऱ्या याघटना पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहेत.
“पोलिस यंत्रणा निष्क्रिय का?” – नागरिकांचा सवाल
या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, अनेकांनी सोशल मीडियावर पोलिसांवर निष्क्रियतेचेआरोप केले आहेत. “घटना घडल्यावर पोलीस येतात, पण घटनांचे पूर्वानुमान घेऊन उपाययोजना का करतनाहीत?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागरिकांची एकमुखी मागणी, चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा!
चोरट्यांचा बंदोबस्त करून परिसरातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यात यावी, अशी भूमिका सर्व स्तरांतून मांडलीजात आहे.
स्थानिक पोलिसांनी कायदाचौकटीत राहून या घटना गांभीर्याने घेत कारवाईस गती द्यावी, अन्यथा नागरिकांमध्येनिर्माण झालेली असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र होईल, अशी जनतेची भावना व्यक्त होत आहे.

























