वणी शहरातील काळे लेआउट परिसरात एका खासगी शिक्षकाच्या घरात चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ₹58,500 किमतीचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
फिर्यादी अमित संजय पारखी (वय 32 वर्षे) हे चंद्रपूरला काही कामानिमित्त गेले होते. आज दिनांक 03 ऑगस्टरोजी सकाळी 04 वाजताच्या सुमारास त्यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील विविध मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.
चोरट्यांनी घरातून –
बोट कंपनीचे होम थेटर (किंमत ₹6000/-)
चांदीचे दोन पाते व तीन पान (2.5 तोळे) – ₹10,000/-
सोन्याचे दोन रिंग व कानातील बि–या (4 ग्रॅम) – ₹30,000/-
रोख रक्कम – ₹8000/-
मनगटी घड्याळे (2 नग) – ₹4000/-
मेकअप बॉक्स (जुना वापरलेला) – ₹500/-
असा एकूण ₹58,500 किंमतीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद कलम 305 (a), 331 (4) बि.एन.एस. अंतर्गत करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपासपो.उप.नि. गुल्हाणे, पोलीस स्टेशन वणी करीत आहेत.
स्थानिकांमध्ये चोरीच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून रहिवासी दहशतीच्या छायेखाली राहत आहेत…

























