दिनांक 3ऑगस्ट 2025 ला स्थानिक यात्रा मैदान हनुमान मंदीरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात कार्यक्रमास सुरुवात झाली. संतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व पूजा करण्यात आली. यानंतर महिलांच्या भजन मंडळातर्फे भक्तिगीते सादर करण्यात आली…
भजन, हळदीकुंकू, दहीहंडी, गोपाळकाला इत्यादी कार्यक्रम ही उत्साहात पार पडले…
या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला…
वणी येथे गेली 25 वर्षे हा उत्सव सातत्याने साजरा होत असून, यंदाचा जयंती सोहळा विशेष उल्लेखनीय ठरला. प्रमुख पाहुणे म्हणून वणीचे पोलिस उपनिरीक्षक आसोरे साहेब नागपूर येथील निनावे साहेब, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप भाऊ रेभे, रविकांत मैंद यांचा ही सत्कार करण्यात आला…
सौं.संध्या अनिल रेभे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला…
त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी सर्व महिलांचा व सहभागींचा सत्कार केला. विशेष पाहुणे निनावे साहेब यांनी मनोगत व्यक्त करत समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष विकास चांदवडकर, संतोष करंडे, अनिल रेभे, मंदाताई बांगरे व सुधाताई मस्के, मंडळाचे सदस्य, तसेच विविध मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे संचालन संतोष करंडे तर आभार प्रदर्शन अनिल रेभे यांनी केले…

महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास विकास चांदवडकर, अनिल भाऊ रेभे, रविकांत मैंद, संतोष करंडे, मिलिंद करंडे, सतीश घोडके, अवी चावरे, जितेंद्र मस्के, गणेश चांदवडकर, कुणाल बांगरे, मंदाताई बांगरे, सुरेखाताई वडीचार, सुधाताई मस्के आणि समाजबांधव उपस्थित होते.

संत नरहरी महाराज यांच्या आशीर्वादाने वणी शहरात एकात्मता, भक्तीभाव आणि समाजबंध अधिक दृढ होत आहे, हे या सोहळ्यातून स्पष्ट झाले.

























