- वणी शहरातील प्रेम नगर झोपडपट्टी परिसरात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पोलिसांनी कारवाई करत लक्ष्मी दिपचंद शिसोदिया (वय 45) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. ही कारवाई 9 ऑगस्ट रोजी रात्री 11.08 वाजता करण्यात आली.
‘फ्रीडम फर्म‘ संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेकडून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची खात्री पटल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक उमेश खुशालराव बेसरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला. पंटरच्या मदतीने छापा टाकल्यावर घटनास्थळी आरोपी शिसोदिया तसेच एक पीडित महिला आढळली.

पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीत आरोपीकडे 300 रुपये रोकड मिळाली. चौकशीत पीडित महिलेने आरोपीने धमकावून वेश्या व्यवसायात ढकलल्याची माहिती दिली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 143, 144(2) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर करीत आहेत.

























