वणी शहरातील कणकवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका घटनेने परिसर हादरलाआहे. मनसेच्या शहर संघटिका आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक विद्या सुधाकर हिवरकर (वय ४७) यांनीराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
विद्या हिवरकर यांचा गृहउद्योगातून चालणारा कपडे व ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय लोकप्रिय होता. त्यांचास्वभाव मनमिळाऊ असल्याने परिसरात त्यांचा मोठा संपर्क जाळ होता. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपलीवेगळी छाप सोडली होती. त्यामुळे त्यांच्या अचानक निधनाने कणकवाडी परिसरात शोककळा पसरलीआहे.

घटनेच्या दिवशी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे पतीला कामावर जाताना डबा बांधून दिला होता. त्यानंतरमात्र दुपारी २ वाजल्यानंतर त्यांनी कोणाचाही फोन उचलला नाही. वारंवार संपर्क न झाल्याने त्यांच्याएका मैत्रिणीने घरी जाऊन पाहिले असता दरवाजा बंद होता. मागच्या खिडकीतून डोकावून पाहिलेअसता त्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. लगेच ही माहिती पसरताचपरिसरात लोकांची गर्दी झाली.
वर्षा यांच्या पश्चात पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. मुलगी दिल्ली येथे नोकरीला असूनमुलगा उच्च शिक्षणानंतर करिअरकडे वाटचाल करत होता. कुटुंब स्थिर आणि सुखी असताना त्यांनीआत्महत्येचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपाससुरू आहे.

























