पैशांच्या वादातून मारहाण…
रंगारिपुरा येथे पैशांच्या व्यवहारातून उसळलेल्या वादात एका 35 वर्षीय तरुणास मारहाण झाल्याची घटना घडली. फिर्यादी गणेश तुळशीराम नागपुरे (रा. मच्छिमार्केट, वणी) यांना स्थानिक दोन तरुणांनी हाताने मारहाण करून जखमी केले. हा प्रकार सोमवार, 15 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश नागपुरे हे आपले थकित पैसे मागण्यासाठी आरोपी अथर्व येरणे (वय 33) व यश येरणे (वय अंदाजे 22, रा. रंगारिपुरा, ता. वणी) यांच्याकडे गेले होते. यावेळी पैशांच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. या वादात आरोपींनी शिवीगाळ करून नागपुरे यांना थापड-बुकीने बेदम मारहाण केली. यात ते जखमी होऊन रक्तस्राव झाल्याचे समजते.
याच दरम्यान आरोपींनी “तुझे पैसे देत नाही, तुला जे करायचे ते कर” अशी धमकी देऊन भीती निर्माण केली, अशी माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात फिर्यादीचा जबानी अहवाल नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 118(1), 115(2), 352 व 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विशाल राठोड करीत
आहेत.

























