वणी पोलीस स्टेशनमध्ये दुर्गा उत्सव मंडळांची बैठक संपन्न…
नवरात्री व दुर्गा विसर्जन उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पडावा, यासाठी वणी पोलीस स्टेशनमध्ये दुर्गा उत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिकांची महत्वाची बैठक पार पडली.
ही बैठक पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत झालेल्या बैठकीला सुमारे १५० ते १७५ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, मिरवणुकीत डी.जे.चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देणे, नशामुक्त मिरवणुका, ठरलेल्या मार्ग आणि वेळेचे काटेकोर पालन करणे अशा विविध सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
👉 महत्वाच्या सूचना :
विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत.
कोणताही सदस्य मद्यपान करून सहभागी होऊ नये.
विसर्जन घाटावर शिस्त आणि शांतता राखावी.
प्रत्येक मंडळाने मंडपात पूर्णवेळ स्वयंसेवक ठेवावा.
आक्षेपार्ह पोस्टर व बॅनर टाळावेत.
बैठकीदरम्यान नागरिक आणि मंडळ पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. सर्वांनी मिळून उत्सव डी.जे. मुक्त, शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे एकमुखाने ठरविले.
✨ या उपक्रमामुळे वणी शहरात येत्या दिवसांत दुर्गा उत्सव अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडेल, असा विश्वा
स व्यक्त करण्यात आला.

























