वणीमध्ये “नमो युवा रन” मॅरेथॉन स्पर्धा – व्यसनमुक्त भारताकडे एक पाऊल ✨
वणी (दि. 24 सप्टेंबर) : भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा तर्फे सेवा पंधरवाडा 2025 या उपक्रमांतर्गत उद्या गुरुवार, दि. 25 सप्टेंबर रोजी “नमो युवा रन” व्यसनमुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या स्पर्धेची सुरुवात सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच लोकमान्य टिळक चौक, वणी येथून होणार आहे.
🏃♂️ स्पर्धेचे गट व अंतर
16 वर्षांखालील मुले-मुली : 2.5 किमी धाव
16 वर्षांवरील स्पर्धक : 3.5 किमी धाव
🎖️ पारितोषिके व बक्षिसे
प्रथम पारितोषिक : अ गट ₹8000 / ब गट ₹5000
द्वितीय पारितोषिक : अ गट ₹2000 / ब गट ₹3000
तृतीय पारितोषिक : अ गट ₹1000 / ब गट ₹2000
याशिवाय प्रत्येक गटातून तीन प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार असून सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
🌟 विशेष उपस्थिती
या उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप शहराध्यक्ष ऍड. नीलेश चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, स्थायी समिती सदस्य विजय चोरडिया, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, कुणाल चोरडिया व संजय पिंपळशेंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
📌 स्पर्धेत प्रवेश निःशुल्क असून सहभागी होण्यासाठी आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. प्रवेश नोंदणी उद्या सकाळी स्पर्धेच्या ठिकाणी केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
- 👉 “नमो युवा रन” मॅरेथॉनमुळे वणीतील तरुणाईत व्यसनमुक्तीचा संदेश पसरवून आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे.

























