रस्त्यावर उभ्या ट्रकला धडक – चौघांचा जीव थोडक्यात बचावला…
वणी तालुक्यात निष्काळजीपणामुळे ट्रकला धडक – चौघे जखमी…
वणी (दि. 29 सप्टेंबर) :
सोमनाळा फाट्याजवळ काल रात्री झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झाले. हा अपघात ट्रक निष्काळजीपणे रस्त्यावर उभा ठेवल्यामुळे झाल्याचे समजते.
फिर्यादी प्रवीण बंडु मेश्राम (वय 42, रा. राजुर कॉलरी, ता. वणी) हे आपल्या तिघा मजुरांसह ट्रक क्र. MH31GB3037 मधून राजुर येथून विटा भरून पाटणबोरी येथे उतरवून परत येत होते. दरम्यान, रात्री सुमारे 8.30 वाजता सोमनाळा फाट्याजवळ ट्रक क्र. MH46AF9483 हा चालकाने रस्त्यावरच उभा केला होता. विशेष म्हणजे ट्रकचे इंडीकेटर सुद्धा सुरू केले नव्हते.
अंधार असल्याने समोरील वाहन चालकांना ट्रक दिसला नाही आणि झालेल्या धडकेत फिर्यादीसह सोबतचे तिन्ही लेबर जखमी झाले. घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.
फिर्यादीच्या डीडी मोमो बयाणावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून वणी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल अविनाश चिकराम पुढील तपास क
रीत आहेत.

























