वणी शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, लायन्स क्लब, ब्राह्मण सभा, काँग्रेस पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांशी निगडित असलेले, समाजसेवेत नेहमी अग्रेसर राहिलेले राजाभाऊ पाथ्रडकर यांचे आज आकस्मिक निधन झाले.

मागील नऊ दिवसांपासून ते जैताई मंदिर येथे नवरात्र उत्सवाच्या सेवेत कार्यरत होते. सेवेदरम्यान त्यांना अचानक अस्वस्थता जाणवली. त्वरित त्यांना वणीतील सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचविणे शक्य झाले नाही.
त्यांच्या आकस्मिक निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सिटी हब मीडिया तर्फे स्वर्गीय राजाभाऊ पाथ्रडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

























