एखाद्या मनुष्याची जेव्हा जडण घडण होते, तेव्हा एखादा विशिष्ट घटक कारणीभूत नसतो. त्याप्रकारे माझ्या घडण घडणीत आजी–आजोबा, आई–वडील, माझं कुटुंब, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ साहित्य संघ, माधवराव सरपटवार, स्व. अरुण राऊत, नरेंद्र इंगोले अशा विविध संस्थां व व्यक्तींच्या संपर्कामुळे व संस्कारामुळे मी घडलो असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा उच्च श्रेणी मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले.
ते स्व. दिलीप कोरपेनवार यांनी सुरू केलेल्या ’मी असा घडलो’ या उपक्रमाअंतर्गत नगर परिषद शाळा क्रमांक 8 मध्ये विद्यार्थ्यांसमोर तिसरे पुष्प गुंफताना बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष मनीषा शिवरकर या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष कार्तिक रुईकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या चित्रा बावणे, मुख्याध्यापक देवेंद्र खरवडे, ज्येष्ठ शिक्षिका सुनीता जकाते उपस्थित होते.
मी असा घडलो हे सांगताना कासावार यांनी आपला प्राथमिक शाळेपासूनचा जीवनपट उलगडून दाखवत त्यांच्या जडणघडणीत आजी, आजोबापासून कशा प्रकारे संस्कार होत गेले. माध्यमिक शाळेत स्काऊट– गाईड चे संस्कार, डी.एड. मध्ये दाते अध्यापन पदविका महाविद्यालयातील प्रशिक्षण, वणी येथे अध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर स्व. अरुण राऊत, नरेंद्र इंगोले, त्या नंतर माधवराव सरपटवार यांची प्रेरणा व प्रोत्साहन, विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सारख्या देशभक्त संघटनेशी जुळल्यामुळे जीवनाला आकार मिळाला. याचा उपयोग नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ या सारख्या संस्थेत काम करताना झाला. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
या शाळेतील विद्यार्थ्यांचे जे पालक स्वच्छता कामगार म्हणून सेवा देतात त्या सचिन बिरहा, रीना/गौरीशंकर असरटे, नरेंद्र हजारे, अवि चवरे, कपिल तोमस्कर, आनंद चवरे, सुमित दिपक सप्रे, पवन तोमस्कर, सुरेंद्र तोमस्कर, निशाताई कावडे यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळेच्या वतीने राष्ट्रपिता ते राष्ट्रपुरुष या पंधरवाड्यात निमित्त आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेते विद्यार्थी जयश्री शिवरकर, खुशी वालकोंडावार, अनुष्का ब्राह्मणे, तृप्ती पेंदोर, शिवांश बिरहा, आरुषी पुरी, गौरी मांढरे, मानवी रुईकर, सलोनी कळसकर, सात्विक गुरनुले यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका सुनीता जकाते यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश तुंबडे यांनी केले. आभार प्रदर्शन काकासाहेब जयभाये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण जगताप, नीलिमा राऊत यांनी परिश्रम घेतले.

























