गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामाजिक कामातून त्यांचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास मदत करून त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, कौशल्य विकास, सेवेतून शिक्षण, सामाजिक संबंध तसेच नेतृत्व गुण निर्माण व्हावे व एक आदर्श नागरिक घडावा म्हणून अनेक उपक्रम घेतल्या जाते. 
त्या सर्व उपक्रमात भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर वर्षी राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्रदान केल्या जातो. गोंडवाना विद्यापीठाशी सलग्नित सर्व महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी यात भाग घेत असून. त्या विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. २०२४-२५ मधला उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार घुग्घूस येथील कुमारी आर्थिका संजय उपाध्येला जाहीर करून दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात आर्थिकाला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कु. आर्थिका ही
पुणे विद्यापीठातर्फे ” वर्ल्ड मोबाईल कॉन्फरन्स ” स्पर्धे करिता दिल्ली येथे असल्या कारणाने तिचा पुरस्कार तिची आई सौ. अनुराधा संजय उपाध्ये आणि वडील श्री. संजय रामचंद्र उपाध्ये यांनी स्वीकारला. कु. आर्थिका ही कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट असून आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता श्री विनय बोढे सरांची ती विद्यार्थिनी आहे.
राष्ट्रीय खेळाडू म्हणून महाराष्ट्रा साठी अनेक सुवर्ण पदके तिने पटकाविलेले आहे. विशेष म्हणजे
26 जानेवारी 2025 ला गणतंत्र दिवस परेड पथसंचालनात तिने महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते .
आर्थिकाच्या कामगिरीबद्दल तसेच पुरस्काराबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
पुरस्काराबद्दल माहिती:- कु.आर्थिका संजय उपाध्ये
B.sc.cs फायनल इयर
शैक्षणिक सत्र २०२४ – २५
१) मुंबई येथील गणतंत्र दिनाच्या परेड करीता निवड.
२) गणतंत्र दिवस परेड मध्ये सर्वात पहिल्या रांगेचे नेतृत्व
३) लोकमत सखी सम्राज्ञी सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त – सन्मानित २०२४
४) कराटे ब्लॅक बेल्ट आणि अनेकवेळा नॅशनल गेमचे प्रतिनिधित्व / सहभाग
५) गोंडवाना विद्यापीठातर्फे कराटे या खेळात अनेकवेळा राज्य स्तरावर ” सुवर्ण पदक ” प्राप्त तसेच राष्ट्रीय स्तरावर निवड
६) विद्यापीठातर्फे ” इंद्रधनुष ” या राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेकरीता निवड
७) विद्यापीठात होणाऱ्या
” उत्कर्ष ”
या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता संकल्प नृत्य यामध्ये निवड
८) जनता महाविद्यालय चंद्रपूर तर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन (एकेरी तसेच दुहेरी),
रस्सीखेच,
फॅन्सी ड्रेस,व्हॉलिबॉल या सर्व प्रकारात सुवर्ण आणि रजत पदक प्राप्त
९) ppt presentation स्पर्धेत प्रथम क्रमांकासहित सुवर्ण पदक प्राप्त
१०) उन्हाळ्यात ग्रामीण भागातील ५ गावांमध्ये ५ ते १७ वर्ष वयोगटातील मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचा ३० दिवसीय वर्ग घेतला.
११) कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक म्हणून परीक्षा घेण्यासाठी विविध विद्यालयात / महाविद्यालयात कार्य संपन्न
१२) विविध ऑनलाइन स्पर्धेत पुरस्कार प्राप्त.

























