वणी शहरातील सुजाता टॉकीज परिसरात आज एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आजाद इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजूला एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. काही वेळानंतरही कोणतीही हालचाल न झाल्याने स्थानिक नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
या घटनेनंतर सुजाता टॉकीज परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

























