वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ११ मध्ये साकेत भुजबलराव यांच्या नावाची चर्चा — लोकाभिमुख कार्यकर्त्याला मिळणार संधी?
वणीत आगामी नगरपरिषद निवडणुकीची चाहूल लागल्याने स्थानिक राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये नव्या चेहऱ्यांच्या संधीबाबत चर्चा सुरू असून, प्रभाग क्रमांक ११ मधून साकेत अविनाश भुजबलराव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
साकेत भुजबलराव हे वणी विधानसभा सोशल मीडिया प्रमुख म्हणून कार्यरत असून, गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. स्थानिक पातळीवर विविध लोकाभिमुख आंदोलनांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांना संधी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होताना दिसते.
पक्ष नेतृत्वाकडूनही त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. सोशल मीडियावर आणि स्थानिक चर्चांमध्ये “साकेत भुजबलराव उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार का?” हा प्रश्न रंग घेत आहे.
स्थानिक नागरिक आणि शिवसेना (ऊबाठा) समर्थकांचा विश्वास आहे की तरुण, सक्रिय आणि डिजिटल माध्यमात पारंगत नेतृत्वाची गरज सध्याच्या राजकारणात आहे. साकेत भुजबलराव यांच्या कार्यशैलीमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आगामी काही दिवसांत पक्षाकडून उमेदवारीच्या घोषणा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधील राजकीय समीकरणे अधिकच रंगणार हे निश्चित आहे.
— वणी प्रतिनिधी, सिटी हब मीडिया…

























