Follow Us On

Monday, February 2, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भयवतमाळमतदारयादीतील गोंधळावर मनसेचा हल्लाबोल : पालिका प्रशासनाचे षडयंत्र असल्याचा शहराध्यक्ष अंकुश बोढे...

    मतदारयादीतील गोंधळावर मनसेचा हल्लाबोल : पालिका प्रशासनाचे षडयंत्र असल्याचा शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा आरोप…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

     

    वणी नगरपरिषदेच्या मतदारयादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप मनसेने केला असून या घोळामागे पालिका प्रशासनाचे षडयंत्र असल्याचा आरोप मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी केला आहे. नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरही मतदारयादी अद्ययावत न केल्यामुळे अनेक नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागांत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    अंकुश बोढे यांनी सांगितले की, “2025 च्या नगरपरिषद निवडणुकीसाठी वणीची नवीन प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक मतदाराचे नाव संबंधित प्रभागाच्या यादीत असणे आवश्यक होते. मात्र पालिकेने ही यादी अद्ययावत न करता जुनीच यादी कायम ठेवली. त्यामुळे एका प्रभागात राहणाऱ्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागाच्या यादीत दिसत आहेत. हा प्रकार नागरिकांना मतदारयादीच्या गोंधळात गुंतवून ठेवण्याचा आणि प्रशासनाला मनमानी कारभाराची मुभा देण्याचा प्रयत्न आहे.”

    बोढे यांनी पुढे सांगितले की, “मतदारयादीवरील आक्षेप नोंदवण्यासाठी 13 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. मात्र त्याआधीच प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नवीन प्रभाग रचनेनुसार यादी सुधारित करावी. प्रत्येक मतदाराचे नाव त्याच्या वास्तव प्रभागात योग्यरीत्या नोंदवले गेले, तरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहील.”

    जर प्रशासनाने ही चूक त्वरित दूर केली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा बोढे यांनी दिला आहे.

    या प्रसंगी मनसेचे कृष्णा निमसटकर, शंकर पिंपळकर, सुरज पळसकर, प्रवीण बोतरा, सुजल तिवरी, अहमद रंगरेज, स्वयंम ठाकरे, नवीन पिंपळकर, श्रेयश वारारकर, योगेश ताडम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी किरण नांदेकर यांची राजकारणात एंट्री...
    02:39
    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए