महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी संपूर्ण वणीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी नागरिकांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्याच्या मंगलकामना करत, या उत्सवाचे स्वागत सर्वांनाच आनंदात करावे, असे आवाहन केले आहे.
बोढे यांनी दिलेल्या शुभेच्छेत म्हटले आहे की, “दिवाळी हा आनंद, नवनवीन आशा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. या पवित्र सणावर आपण सर्वजण एकमेकांसोबत प्रेम आणि सद्भावनेने एकत्र यावे. मी वणीकरांच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध राहीन आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”
दिवाळी हा प्रकाशाचा सण असून, अंधारावर विजय, नवीन सुरुवात आणि एकत्रतेचा संदेश देतो. वणीकरांनी हा सण आनंदात साजरा करून आपापल्या घरात प्रेम, सद्भाव आणि आनंद पसरवावा. या दिवशी फटाके, दिवे आणि गोडधोडींच्या माध्यमातून आपण एकमेकांशी आपुलकीचे नाते जपतो आणि सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसारित करतो.

























