सिटी हब मिडिया
वणीतील नामांकित सहकारी संस्था वसंत जिनिंग अँड प्रेसिंग येथे आज झालेल्या विशेष सभेत अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव 13 विरुद्ध 1 मतांनी मंजूर झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून संस्थेच्या कामकाजात अस्पष्टता, निर्णयप्रक्रियेत एकाधिकार आणि गैरव्यवहाराचे आरोप उघडपणे पुढे येत होते. यामुळे संचालक मंडळातील अनेक सदस्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. अखेर 3 नोव्हेंबर रोजी 13 संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत 12 नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंग सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्याचे आदेश दिले. दुपारी 1 वाजता झालेल्या या सभेत मतदान प्रक्रियेत 14 पैकी 13 संचालकांनी प्रस्तावाच्या बाजूने तर केवळ 1 सदस्याने विरोधात मतदान केले. तीन सदस्य अनुपस्थित राहिले.
या निर्णयामुळे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांचे पद धोक्यात आले असून, संस्थेच्या पुढील नेतृत्वाबाबत चर्चा आणि हालचालींना वेग आला आहे.
वणी परिसरातील एक प्रतिष्ठित सहकारी संस्था असलेल्या वसंत जिनिंगमधील ही घटना स्थानिक राजकीय आणि सहकारी वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
City Hub Media…

























