सिटी हब मीडिया – वणी…
भाजपला रामराम करून शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केल्यानंतर विजय चोरडिया यांनी वणी परिसरात संघटनात्मक बांधणीचा जोरदार सपाटा लावला आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरडिया यांनी अल्पावधीतच पक्ष संघटनाला नवसंजीवनी दिली आहे. अनेक वार्डातून कार्यकर्ते आणि नागरिक शिंदे गटात प्रवेश करत आहेत, तर इतर पक्षांतील लोकही मोठ्या संख्येने शिवसेनेत सामील होत आहेत.
नुकतीच विजय चोरडिया यांची यवतमाळ–राळेगाव–वणी विधानसभा क्षेत्रासाठी संघटन मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचा प्रभाव आणि जबाबदारी दोन्ही वाढली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वणी तालुक्यातील विविध भागांत पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी सातत्याने सभा, संपर्क मोहिमा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम सुरू आहेत.
विजय चोरडिया यांच्या प्रवेशानंतर शिंदे गटाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि संघटनकौशल्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
पक्ष बांधणीसाठी निलेश परगंटीवार, आशिष काळे, राहुल मुंजेकार, शिवराज पेचे, हिमांशू बोरा यांसारखे पदाधिकारी तन-मन-धनाने काम करत आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे वणीतील शिवसेना शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रत्येक समाजघटक, जाती-धर्मातील लोक शिंदे गटाशी जोडले जात आहेत, आणि आगामी नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आपली ठसा उमटवेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांत निर्माण झाला आहे.
स्थानिक राजकीय पटलावर आता “विजय चोरडिया प्रभाव” दिसू लागला असून, इतर पक्षांमध्ये याची स्पष्ट धास्ती जाणवते. चोरडिया यांच्या नेतृत्वाखालील संघटनात्मक चळवळ वणी राजकारणात नवा अध्याय लिहीत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
🟧 सिटी हब मीडिया – वणी 🟧

























