सिटी हब मीडिया, वणी
मनसे शहराध्यक्षांचा धडाकेबाज राजकीय यूटर्न; भाजपमध्ये प्रवेशामुळे वणीच्या राजकारणात खळबळ…


मनसे वाढीसाठी एक वर्षाची धडपड, पण…अंकुश बोढे यांनी गेल्या वर्षभरात मनसेचा विस्तार करण्यासाठी गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सातत्याने काम केले. त्यांच्या कामगिरीवर आधारित त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. संघटन वाढीसाठी ते सतत सक्रिय होते.
मनसे–उबाठा गट युतीमुळे निर्माण झालेली नाराजी
शिवसेना (उबाठा गट) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांनंतर अंकुश बोढे यांच्या मनात नाराजी निर्माण झाली. दोन्ही ठाकरेंच्या पाट्यांवर एकत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चांनी मनसेच्या अंतर्गत समीकरणांमध्ये मोठा बदल जाणवला.या बैठकीत बोढे उपस्थित असले तरी या युतीमुळे त्यांचे राजकीय स्थान कमकुवत होत असल्याचा त्यांना भास झाला.प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी असूनही, पक्षाकडून अपेक्षित मान्यता मिळत नसल्याची भावना त्यांच्यात वाढत गेली.अचानक घेतलेला धडाकेबाज निर्णय – थेट भाजपमध्ये प्रवेश…अखेर, अचानकच अंकुश बोढे यांनी यवतमाळ येथे भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या संघटन कौशल्य आणि कार्यक्षमता पाहून भाजपने त्वरित त्यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली. त्यांच्या प्रवेशावेळी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
वणीतील राजकारणात तापमान वाढलेअंकुश बोढे यांच्या प्रवेशानंतर वणीच्या राजकारणात गुलाबी थंडीऐवजी “निवडणुकीची गर्मी” वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, एक घनदाट कार्यकर्ता आणि पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याची खंत कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.दुसरीकडे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “ओबीसी समाजातील प्रभावी नेता भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्ष अधिक मजबूत होणार” अशी चर्चा रंगली आहे.नगरपालिका निवडणूक युद्ध अधिक रंजक?या अचानक झालेल्या राजकीय घडामोडीनंतर वणीची आगामी निवडणूक अधिक रोमांचक झाली आहे.पुढील काही दिवसांत आणखी काही राजकीय हालचाली पाहायला मिळू शकतात, असे संकेत मिळत आहेत.सिटी हब मीडिया लवकरच पुढील अपडेटसह परत येईल. सिटी हब मीडिया, वणी..

























