सिटी हब मिडिया वणी…
विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार—
भाजपकडून विद्या खेमराज आत्राम नगराध्यक्ष पदासाठी अधिकृतपणे मैदानात…
वणी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मोठी हालचाल घडली आहे. विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जमाती महिला राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपने विद्या खेमराज आत्राम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाच्या अंतर्गत स्तरावर गेल्या काही दिवसांत वेगाने झालेल्या बैठका आणि चर्चांनंतर हा निर्णय झाल्याचे कळते.
संघसंस्कार + उच्चशिक्षण = सक्षम नेतृत्व
विद्या खेमराज आत्राम यांची ओळख वणी शहरात एक उच्चशिक्षित, शांत, संस्कारी व मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व अशी आहे.
शैक्षणिक पृष्ठभूमि
विद्या खेमराज आत्राम
सहाय्यक शिक्षिका, आदर्श हायस्कूल वणी…
Double M.A (मराठी, समाजशास्त्र)B.Ed
घराण्याला संघसंस्काराची भक्कम पार्श्वभूमी…
पती: सचिन ऊर्फ खेमराज सूर्यभान आत्राम,
23 वर्षांपासून यवतमाळ अर्बन बँक सेवेत
भाजपमध्ये त्यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळण्याचे कारण म्हणजे त्यांचे शिक्षण, कुटुंबातील संघसंस्कार आणि शहराशी जोडलेली सकारात्मक प्रतिमा.
विधानसभा निवडणुकीत मिळालेली लीड – आता नगराध्यक्ष पदात पुढे जाण्याची संधी…
मागील विधानसभा निवडणुकीत वणी भागात भाजपला चांगली लीड मिळाली होती.
विश्वसनीय सूत्रांनुसार, हीच सकारात्मक लाट टिकवून ठेवत नगराध्यक्ष पदातही पक्षाने अधिक बळकट होण्याची संधी पाहून विद्यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आले.
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सभांना चांगला प्रतिसाद…
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, वणीतील विविध प्रभागांत माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सभांना सातत्याने उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांचा उल्लेख नागरिक स्वतः पुढे येऊन करीत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या कार्यकाळातील विकासाचा मजबूत पाया
माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या काळात सुरू झालेल्या अनेक विकासकामांचा लाभ वणीच्या नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात मिळाला होता —
बगीचे, कॉंक्रिट रस्ते, भूमिगत नाले आणि शहरातील आवश्यक सुविधा या सर्वांची महत्त्वपूर्ण पायाभरणी या काळात झाली.
विद्या आत्राम यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर, या विकास वारशावर आधारित नव्या योजनांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वणीतील निवडणूक आता गुणवत्ताधारित महिला नेतृत्वाकडे…
भाजपकडून जाहीर झालेल्या विद्यांच्या उमेदवारीनंतर वणी नगराध्यक्षपदाची निवडणूक अधिक सकारात्मक, विकासकेंद्री आणि महिला नेतृत्वाच्या दिशेने झुकलेली दिसत आहे.
संघसंस्कार, शैक्षणिक पात्रता, सामाजिक प्रतिमा आणि पक्षाच्या विकासदृष्टीकोनासह विद्या आत्राम यांची उमेदवारी वणीतील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
सिटी हब मीडिया वणी कडून पुढील अपडेटस लवकरच…

























