सिटी हब मीडिया, वणी
प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपकडून सौ. प्रमिला मनोज चौधरी यांना अधिकृत उमेदवारी
वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ साठी भाजपने सौ. प्रमिला मनोज चौधरी यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड जाहीर केली आहे. स्थानिक पातळीवर विविध सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभागामुळे त्यांचे नाव मागील काही दिवसांपासून चर्चेत होते.
सौ. चौधरी या नगरपरिषद महिला बचत गटाच्या अध्यक्षा म्हणून काम करत असून महिलांच्या बचत गटांचे सशक्तीकरण, आर्थिक शिस्त आणि स्वावलंबनासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे.
त्याचबरोबर त्या मानवी हक्क सुरक्षा परिषद, वणीच्या शहराध्यक्ष या पदावर कार्यरत राहून नागरिकांच्या हक्क संरक्षण, तक्रार निवारण आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी काम केले आहे.
याशिवाय त्या जगदंबा दुर्गा उत्सव मंडळाच्या उपाध्यक्षा असून सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात त्यांचा सहभाग कायम राहिला आहे.
सामाजिक, सांस्कृतिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या या कामांच्या पार्श्वभूमीवर सौ. चौधरी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा, महिला विकास आणि स्थानिक प्रश्नांवर काम करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

























