सिटी हब मिडिया वणी…
संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक प्रवेश; वणीचे राजकारण नव्या वळणावर…
वणी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोमिनपुरा येथील शेकडो मुस्लिम युवकांचा भाजपमध्ये प्रवेश…आता फक्त प्रभाग १० नाही—पूर्ण वणी शहरात राजकीय रंग बदलणार!
आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा वेगाने वाढणारा प्रभाव आणखी ठळक झाला आहे. मोमिनपुरा येथील शेकडो मुस्लिम युवकांनी भारतीय जनता पक्षात केलेल्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, याचा परिणाम फक्त प्रभाग १० पुरता मर्यादित न राहता संपूर्ण वणी शहराच्या राजकीय रंगावर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारधारेवर विश्वास दाखवत एकत्रितपणे भाजपचा झेंडा हाती घेतला. प्रभाग क्रमांक १० मध्ये या भागाचे प्रतिनिधित्व असून येथील भाजप उमेदवार म्हणून अनिल चिंडालिया आणि महिला गटातून आरती वांढरे हे रिंगणात आहेत. मात्र या मोठ्या प्रवेशाचा प्रभाव शहरभर जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील कार्यकाळात आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नांतून मुस्लिम वस्त्यांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, नालीव्यवस्था, वसाहती विकास अशी अनेक मूलभूत कामे झाली. याच विकासाच्या आधारावर मोमिनपुरा परिसरातील युवकांनी आज भाजपची सदस्यता घेत पक्षाला विजयाकडे नेण्याचा संकल्प केला.
या सामूहिक प्रवेशाने “मुस्लिम समाज भाजपला पाठिंबा देत नाही” हा आतापर्यंतचा गैरसमज पूर्णपणे खोटा ठरला आहे. उलट मुस्लिम युवकांचा भाजपकडे कल वाढत असून पक्षाला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे.
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत झालेला हा प्रवेश इतर पक्षांसाठी मोठा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकीत पूर्ण वणी शहरात सत्ता समीकरण बदलण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. मुस्लिम वस्त्यांमध्ये मिळणारा वाढता पाठिंबा भाजपला निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

























