सिटी हब मिडिया वणी…
प्रश्न – उच्च शिक्षित असूनही राजकारणात का आलात?*
पायल यशवंत तोडसाम —उच्च शिक्षण घेऊन मी एक चांगली शासकीय नोकरी सहज करू शकले असते. मी एक उत्तम क्रिकेटपटू देखील आहे. पण मला नेहमीच वाटत आलं की नोकरी म्हणजे एका चौकटीत राहून सेवा; मात्र वणीकरांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांचं होतं-न-होतं प्रत्यक्ष हाताळायचं तर राजकारणाचाच मार्ग योग्य आहे. वणी ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी — इथल्या नागरिकांच्या डोळ्यांतील अपेक्षा पाहून माझ्या मनात एकच विचार पक्का झाला: ‘या शहरासाठी काम करायचं, या लोकांच्या प्रश्नांचं समाधान करायचं!’”

यावर्षी नगराध्यक्ष जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव निघाल्याने विविध पक्षांकडून त्यांना उमेदवारीची ऑफर आली.
“मी कधीही पदासाठी किंवा प्रसिद्धीसाठी राजकारणात आले नाही. वणीकरांच्या समस्या मला जवळून माहित आहेत. पाणी, रस्ते, महिलांची सुरक्षा, स्वच्छता, मूलभूत सुविधा—या सर्वांवर काम करण्याचा माझा निर्धार आहे. म्हणूनच मी हा मार्ग निवडला. माझ्या लोकांसाठी, माझ्या शहरासाठी काम करणं हेच माझं खरं ध्येय आहे.”

























