सिटी हब मिडिया वणी..
“शिवसेनाच का?
इतर पक्षांच्या ऑफर असूनही तुम्ही शिवसेना (एकनाथ शिंदे गट) का निवडला?
“राजकारणात येताना कोणत्या पक्षातून लढायचं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मला नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जवळचे वाटले—‘80% समाजकारण, 20% राजकारण’. आज त्या विचारांची खरी परंपरा जपणारा नेता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांचं कार्य, रात्री-अंधारातही लोकांच्या अडचणी सोडवण्याची पद्धत आणि महिलांसाठी त्यांनी राबवलेल्या योजना—यांनी माझा विश्वास निर्माण केला,” असे पायल तोडसाम स्पष्टपणे सांगतात.
“आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी राठोड,माजी आमदार विश्वास नांदेकर,आणि संघटक विजय चोरडिया यांनी जे प्रामाणिक नेतृत्व दिलं आहे, ते माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्यासाठी ताकद देणारं आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास आणि जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा यामुळेच मी शिवसेना निवडली. शिवसेना ही माझी राजकीय यात्रा नाही, तर वणीच्या विकासासाठी माझी खरी ओळख आहे,” असे त्या सांगतात.

























