सिटी हब मीडिया, वणी…
प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रमिला ताई चौधरी आघाडीवर — प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नावाची जोरदार चर्चा.
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आज संपत असताना प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपच्या सौ. प्रमिला मनोज चौधरी यांच्या प्रचाराला नागरिकांचा ठोस आणि उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र स्पष्ट दिसले. गेल्या काही दिवसांपासून घराघरांत होत असलेल्या संवादांमध्ये तसेच स्थानिक चर्चांमध्ये “प्रमिला ताई चौधरी” हे नाव मोठ्या प्रमाणात दुमदुमत आहे.
प्रभागातील सामाजिक सहभाग, संघटनात्मक काम आणि नागरिकांशी असलेल्या त्यांच्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे प्रभाग ८ मध्ये चौधरी यांची लोकप्रियता वाढत गेली आहे.
सौ. चौधरी या नगरपरिषद महिला बचत गटाच्या अध्यक्षा म्हणून महिलांच्या आर्थिक आणि संघटनात्मक बळकटीसाठी कार्यरत राहिल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबन आणि कौशल्यविकासाचे विविध उपक्रम त्यांनी उपलब्ध करून दिले.
त्याचबरोबर मानवी हक्क सुरक्षा परिषद – वणी शहराध्यक्ष या पदावर त्यांनी नागरिकांच्या हक्क संरक्षण, तक्रार निवारण आणि सामाजिक प्रश्नांवरील कामाला प्राधान्य दिले. प्रभागातील अनेक ठोस मुद्द्यांवर त्यांनी थेट हस्तक्षेप केल्याने नागरिकांमध्ये त्यांचा विश्वास वाढला आहे.
यासोबत त्या जगदंबा दुर्गा उत्सव मंडळाच्या उपाध्यक्षा असून सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. समाजातील सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
सामाजिक क्षेत्र, महिलांची बांधणी, सांस्कृतिक सहभाग आणि नागरिकांशी असलेली जवळीक यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये सौ. चौधरी यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील त्यांच्या प्रचारफेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
निवडणूक तोंडावर असताना प्रभागातील चर्चांमध्ये “प्रमिला ताई चौधरी आघाडीवर” अशी भावना व्यक्त होत आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा, महिला प्रश्न आणि स्थानिक विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

























