सिटी हब मिडिया वणी…
🔴 वणीतील गाडगेबाबा चौक दरोडा प्रकरण – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी…
🔴 मुख्य दोन आरोपींसह सहा जणांचा गुन्ह्यात सहभाग – मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त… शहरातील गाडगेबाबा चौकात व्यापारी संजय कोंडावार यांच्या घरी 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अंदाजे दोन वाजेच्या दरम्यान चाकूचा धाक दाखवत झालेल्या दरोड्याने शहर हादरले होते. दरोडेखोरांनी संजय कोंडावार व चौकीदाराला मारहाण करत ₹1,58,000 रोख रक्कम तसेच सोने-चांदीचे दागिने असा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते. संजय कोंडावार यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणातील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व वणी पोलीस ठाण्याने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेत मोठी कामगिरी केली. कॉलेजजवळ उमरसरा रोडवर राहणारा सागर बजरंग धोंगडे (वय 34 वर्षे, रा. गोदनी, यवतमाळ) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याचे धक्कादायक तपशील उघड झाले.
सागर धोंगडे यांनी कबुलीजबाबात सांगितले की, श्रीमती वैशाली संजय वाघमारे (वय 45 वर्षे, रा. न्यू नरसाळा, नागपूर) हिच्या मदतीने तसेच अन्य पाच साथीदारांच्या सहकार्याने हा दरोडा घातला. त्यानंतर पोलिसांनी वैशाली वाघमारे हिला देखील ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींच्या कबुलीजबाबानुसार चोरीस गेलेला मुद्देमाल मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला —
रोख रक्कम : ₹66,358
सोने-चांदीचे दागिने : ₹1,57,000
असा एकूण लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चार फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच संपूर्ण टोळीला पकडले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश चव्हरे, सपोनी दत्ता पेंडकर, पोउपनि धनराव हाके, अमलदार सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, नरेश राठोड, सतीश फुके, दिगांबर पिलावन, तसेच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व वणी युनिटच्या पथकांनी केली.
पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे वणी शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

























