सिटी हब मिडिया वणी…
समाजकार्यात सदैव सक्रिय, सामान्य माणसाच्या दुःखात धावून जाणारे आणि मित्रांसाठी जीवाला जीव लावणारे उमेश पोद्दार यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मित्रमंडळी, सहकारी व नागरिकांकडून त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत उमेश पोद्दार पुढे आले आहेत. गरीबीचे वास्तव जवळून अनुभवल्यामुळे ते आजही गोरगरिबांच्या दुःखाशी आपुलकीने जोडलेले आहेत. विशेषतः दुःखाच्या प्रसंगी ते गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. अनेक वेळा अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता भासल्यास, ते स्वतःकडून किमान ११ हजार रुपयांची मदत करत आले आहेत. एका गावात आग लागल्याच्या घटनेतही त्यांनी गरजूंना योग्य मदत करून अनेक गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.
स्वतःच्या क्षमतेपलीकडे मदतीची गरज भासल्यास, उमेश पोद्दार हे विजय चोरडिया यांच्या माध्यमातूनही गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतात. विजय चोरडिया यांचे ते विश्वासू व निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जात असून, संघटन, नियोजन व जनसंपर्काच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
कठीण परिस्थितीतून पुढे येत आपल्या मेहनतीने, कष्टाने व कौशल्याच्या जोरावर उमेश पोद्दार यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोक्षधाम सेवा समिती, वणी येथे त्यांनी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
मित्रत्व आणि निष्ठा ही उमेश पोद्दार यांची सर्वात मोठी ओळख मानली जाते. अनेकांचे मत आहे की, एकवेळ जवळची व्यक्ती गद्दार ठरू शकते; मात्र उमेश पोद्दार मित्रतेमध्ये तसेच जीवनात कधीही, कुणाशीही गद्दारी करू शकत नाहीत. सहकाऱ्यांना जेव्हा गरज भासते, तेव्हा ते ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही त्यांनी मित्रांच्या विजयासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत प्रचार-प्रसार केला आणि कोणालाही एकटे पडू दिले नाही.
अशा दिलदार, संघर्षातून घडलेल्या आणि समाजासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या उमेश पोद्दार यांना वाढदिवसानिमित्त मित्रमंडळींसह सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सिटी हब मीडिया, वणी तर्फेही त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

























