सिटी हब मिडिया वणी…
वणी नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाचे संघटन मंत्री विजय चोरडिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वणीकर जनतेने दिलेला निर्णय आपण मान्य करत असून, लोकशाही प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना शिंदे गटावर विश्वास ठेवून ज्यांनी मत दिले, त्या सर्व नागरिकांचे त्यांनी मनापासून आभार मानले. निवडणुकीत उमेदवार निवडून आले नसले तरी, अनेक प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाने भाजप व उबाठा पक्षांना सक्षम लढत दिली असून, पक्षाची उपस्थिती आणि ताकद शहरात जाणवली असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
संघटन मंत्री म्हणून कार्य करताना विजय चोरडिया यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. या निवडणुकीत मिळालेली मते ही जनतेचा विश्वास आणि पाठिंबा दर्शवितात, असे त्यांनी नमूद केले.
पुढील काळात वणी शहरातील नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि अपेक्षा यासाठी शिवसेना शिंदे गट कायम जनतेच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात वणीमध्ये शिवसेना शिंदे गट अधिक सक्षम आणि प्रभावी राजकीय शक्ती म्हणून पुढे येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.


























