सिटी हब मिडिया वणी…
वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अश्लेषा जेनेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभय पारखी तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. सतीश बाविस्कर उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गणित विषयावर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडविण्याची क्षमता विकसित व्हावी, यासाठी ‘I’m Samarth’ ही गणित स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या तार्किक विचारांना चालना देण्यासाठी गणित प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
मार्गदर्शन करताना श्री. सतीश बाविस्कर यांनी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणित क्षेत्रातील अमूल्य योगदानाचे महत्त्व विशद केले. रामानुजन यांचे कार्य संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री. ओमप्रकाशजी चचडा व सदस्य श्री. विक्रांतजी चचडा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन कु. आफरीन अंसारी व कु. पलक रेवती यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. जिगीषा कुडमेथे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणित शिक्षिका कु. तेजस्विनी झाडे, कु. प्रगती वरहाटे, कु. चेतना लोडे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

























