सिटी हब मिडिया वणी…
नगरपालिकेत सरकार स्थापनेपूर्वीच लक्ष्मण उरकुडेंचा जनहिताचा पुढाकार…
सध्या नगरपालिकेमध्ये औपचारिकरित्या भाजपचे सरकार बसायचे आहे. मात्र त्याआधीच भाजपचे प्रभाग क्रमांक ३ मधील नवनिर्वाचित नगरसेवक लक्ष्मण उरकुडे हे जनतेच्या प्रश्नांबाबत सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.
आज लक्ष्मण उरकुडेंनी मुख्याधिकारी, नगरपालिका वणी यांना लेखी निवेदन देत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. नगरपालिका कर्मचाऱ्यांची अधिकृत जेवणाची वेळ दुपारी २ ते ३ अशी असताना अनेक कर्मचारी ३ वाजल्यानंतरही वेळेवर कामावर हजर राहत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या वणीकर नागरिकांना विनाकारण तासन्तास थांबावे लागते, इतर कामे खोळंबतात आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो, असे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी तसेच सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर कामावर उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी ठाम मागणी लक्ष्मण उरकुडेंनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
याच निवेदनामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक ३ मधील खालील नागरी समस्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले —
आनंद नगरमधील हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता व सुव्यवस्था
राधानगरी समोरील ओपन स्पेसचे नियोजन
प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा
बंद असलेल्या स्ट्रीट लाईट्सचे नियोजन व दुरुस्ती
नाना नाणी पार्कसाठी नवीन टेंडर काढून नव्या नियोजनाची अंमलबजावणी
परिसराची नियमित स्वच्छता
भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक लक्ष्मण उरकुडे यांनी निवडणुकीनंतर आत्तापासूनच कामांचा धडाका लावत प्रशासनावर आपली वेगळी छाप सोडण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेतील शिस्त, पारदर्शकता आणि जनतेच्या सोयीसाठी ते निर्णायक भूमिका बजावतील, अशी अपेक्षा वणीकर नागरिक व्यक्त करत आहेत.

























