सिटी हब मिडिया वणी…
वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेनेच्या तिकिटावर अक्षय बोथरा यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यांनी पराभव शांतपणे स्वीकारत जनसेवेचा आपला संकल्प कायम ठेवला आहे. निवडणूक संपल्यानंतरही आपण जनतेच्या सेवेसाठी आणि संपर्कात सातत्याने राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
अक्षय बोथरा यांनी सांगितले की, “मी नगरसेवक नसलो तरी जनसेवक म्हणून कायम कार्यरत राहीन. जनतेच्या समस्या, अडचणी आणि प्रश्नांसाठी मी नेहमी उपलब्ध असेन.” नागरिकांनी केव्हाही संपर्क साधावा, त्यांच्या हाकेवर तत्काळ मदतीसाठी धाव घेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य करत त्यांनी आपल्या मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. निवडणूक जिंकणे-हरणे हे राजकारणाचा भाग असले तरी जनतेशी नातं टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “जनता ही सर्वतोपरी आहे,” या भूमिकेतूनच आपण पुढील काळातही जनसंपर्क कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक दहा तसेच परिसरातील कुठलेही काम नगरपालिकेमध्ये अडकल्यास, त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अक्षय बोथरा यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे हे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या सोयीसाठी अक्षय बोथरा यांनी आपला मोबाईल क्रमांक “8788709030”
सर्वांसाठी खुला ठेवला असून, प्रभागातील कोणतीही समस्या, तक्रार किंवा अडचण असल्यास थेट संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले आहे. निवडणूक हरली तरी जनतेच्या सेवेत सक्रिय राहण्याच्या या भूमिकेमुळे अक्षय बोथरा यांच्या निर्धाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























