Follow Us On

Sunday, February 1, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रपुढील पाच वर्षांत वणीच्या विकासाला नवे आयाम – माजी नगरसेवक व भाजप...

    पुढील पाच वर्षांत वणीच्या विकासाला नवे आयाम – माजी नगरसेवक व भाजप जिल्हा सचिव संतोष डंभारे यांची प्रतिक्रिया…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला एकहाती विजय हा विकासकामांचा विश्वास, संघटनात्मक ताकद आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या तन-मन अर्पून केलेल्या कार्याचा परिणाम असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सचिव तथा माजी नगरसेवक संतोष डंभारे यांनी केले आहे. वणीतील भाजपच्या विजयाबाबत समाधान व्यक्त करताना त्यांनी ही प्रतिक्रिया सिटी हब मीडियाशी बोलताना दिली.

    सन २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले संतोष डंभारे यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्या काळात सुरू केलेली तसेच काही अपूर्ण राहिलेली विकासकामे पुढील काळात पूर्णत्वास नेली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    या निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी संतोष डंभारे यांनी तन-मन अर्पून काम केले. प्रचार, जनसंपर्क, बैठका तसेच संघटनात्मक पातळीवर ते सातत्याने सक्रिय राहिले. भाजपचे जिल्हा सचिव म्हणून पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांची आवर्जून उपस्थिती असते. पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असून, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

    संतोष डंभारे म्हणाले की, “मागील पाच वर्षांत आमच्या टीमने वणीच्या विकासासाठी भक्कम पाया घातला आहे. आता भाजपची नवी टीम पुढील पाच वर्षांत या कामांना गती देत वणीच्या विकासाला नवे आयाम देईल.”

    माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांच्या नेतृत्वात भाजपची नवनिर्वाचित टीम जोमाने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, कुठलीही अडचण उद्भवल्यास आपल्या अनुभवाचा लाभ नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना देण्यासाठी आम्ही सदैव तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    दरम्यान, संतोष डंभारे यांनी वणीकर जनतेला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याताई आत्राम आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत वणी शहराचा विकास अधिक गतीने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

    या निवडणुकीत भाजपचे १८ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे एकूण १९ उमेदवार निवडून आल्याने वणी नगरपालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. या यशामागे संतोष डंभारे यांच्यासारख्या निष्ठावान, विचारधारेशी समर्पित कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असल्याचे मत पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी तृतीय दिवस,जैताई मंदिर कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:46:32
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए