Follow Us On

Sunday, February 1, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रजनतेची तक्रार, तात्काळ कृती; निखिल खाडे–किरण देरकर यांचा समन्वय,प्रभाग ९ मध्ये विकासाचा...

    जनतेची तक्रार, तात्काळ कृती; निखिल खाडे–किरण देरकर यांचा समन्वय,प्रभाग ९ मध्ये विकासाचा नवा संदेश; निवडणुकीनंतरही जनतेसाठी एकत्र काम!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    निवडणूक संपली, आता विकासाला प्राधान्य; प्रभाग ९ मध्ये राजकीय मतभेद विसरून जनतेसाठी संयुक्त पुढाकार…

    निवडणूक संपल्यानंतर राजकीय मतभेद बाजूला ठेवत प्रभागातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा सकारात्मक संदेश प्रभाग क्रमांक ९ मधून पुढे आला आहे. शिवसेनेचे निखिल खाडे व प्रभाग ९ च्या विद्यमान नगरसेविका उबाठाच्या किरण देरकर यांनी एकत्र येत नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

    निखिल खाडे यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी निराश न होता जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.

    आज प्रभागातील काही नागरिकांनी खांबावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याची तक्रार निखिल खाडे यांच्याकडे केली. या बंद स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तक्रार मिळताच निखिल खाडे यांनी तात्काळ ही बाब नगरसेविका किरण देरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनीही तत्परतेने नगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देत कारवाईचे आदेश दिले. परिणामी बंद असलेल्या स्ट्रीट लाईटची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली आणि प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

    निखिल खाडे व नगरसेविका किरण देरकर यांच्या समन्वयातून प्रभागातील एक महत्त्वाची समस्या त्वरित मार्गी लागली. निवडणूक संपल्यानंतर राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून जनहितासाठी काम केल्यास समस्यांचे निराकरण किती सहज शक्य होते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

    या प्रसंगी निखिल खाडे यांनी सांगितले की, “प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. नागरिक कधीही मला भेटू शकतात. जनतेच्या सेवेत मी कायम उपलब्ध असेन.”

    जर प्रत्येक प्रभागात निवडणुकीनंतर सर्व राजकीय पक्षांनी अशाच प्रकारे समन्वय साधत जनतेच्या हितासाठी काम केले, तर नागरिकांच्या समस्या अल्पावधीत सुटू शकतात, असा आशावादही यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी तृतीय दिवस,जैताई मंदिर कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:46:32
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए