Follow Us On

Friday, March 20, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeक्राइमदोन लहान मुलांना सोडून चिखलगाव येथे प्राचार्य पदावर कार्यरत शिक्षिकेची आत्महत्या!

    दोन लहान मुलांना सोडून चिखलगाव येथे प्राचार्य पदावर कार्यरत शिक्षिकेची आत्महत्या!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    वणी तालुक्यातील चिखलगाव परिसरात बुधवारी सायंकाळी एक अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना उघडकीस आली. उच्चशिक्षित व प्राचार्य पदावर कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    युगंधरा स्वप्नील खरबडे (वय अंदाजे ३५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून त्या चिखलगाव येथील महादेव नगर परिसरातील एका बहुमजली इमारतीत पतीसह वास्तव्यास होत्या. त्या येथील राजकुंवर महिला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या.

    मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी स्वप्नील खरबडे हे कामानिमित्त मारेगाव येथे गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांनी अनेक वेळा घराचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी अखेर दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी बेडरूममध्ये युगंधरा खरबडे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

    घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला व उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची माहिती मृत महिलेच्या आई-वडिलांना देण्यात आली असून ते तत्काळ वणी येथे दाखल झाले.

    मृत युगंधरा यांच्या पश्चात पती, १३ वर्षांचा मुलगा व अवघ्या ३ महिन्यांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी महादेव नगर येथे सदर फ्लॅट खरेदी केला होता. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए