सिटी हब मिडिया वणी…
कृष्णा मास्टर्स अकॅडमी, वणी – गुणवत्तापूर्ण शिक्षणातून यशाकडे नेणारी विश्वासार्ह संस्था…
आजच्या बदलत्या आणि अत्यंत स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध तयारी आणि सातत्याची गरज भासते. हीच गरज ओळखून वणी शहरात कार्यरत असलेली कृष्णा मास्टर्स अकॅडमी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाची भूमिका बजावत आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी अकॅडमीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कृष्णा मास्टर्स अकॅडमीमध्ये CBSE अभ्यासक्रमाअंतर्गत इयत्ता 8वी, 9वी व 10वीसाठी तसेच 11वी व 12वीसाठी JEE, NEET आणि MHT-CET या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची सखोल तयारी करून घेतली जाते. येथे अभ्यासक्रम संकल्पनात्मक पद्धतीने शिकवला जात असून परीक्षाभिमुख सरावावर विशेष भर दिला जातो.
अनुभवी, विषयतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे सतत लक्ष ठेवणाऱ्या शिक्षकवर्गामुळे अकॅडमीची ओळख निर्माण झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन, नियमित चाचण्या, परफॉर्मन्स अॅनालिसिस, डाऊट क्लिअरिंग सेशन्स तसेच अभ्यासाचे नियोजन करून देण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांची कामगिरी सातत्याने सुधारताना दिसून येते.
शिस्तबद्ध अभ्यासक्रम, सकारात्मक वातावरण आणि योग्य दिशादर्शन यामुळे कृष्णा मास्टर्स अकॅडमीचे अनेक विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. परिणामी, वणी परिसरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये या अकॅडमीबद्दल विश्वास अधिक बळकट होत आहे.
कृष्णा मास्टर्स अकॅडमीचे कार्यालय L.T. कॉलेजजवळील ताजणे ब्रदर्स बिल्डिंग, वणी येथे असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी साधू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळ न दवडता प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.
📞 संपर्क क्रमांक:
8668931691 | 8149733710 | 7887771331

























