सिटी हब मिडिया वणी…
आजच्या धावपळीच्या युगात मानवी आरोग्यावर होणारा मानसिक ताणतणाव आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, पुणे येथील सुप्रसिद्ध आध्यात्मिक संस्था ‘तेजज्ञान फाउंडेशन’ (हॅपी थॉट्स) च्या वतीने वणी शहरात एका विशेष अभ्यासपूर्ण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर आधारित हे शिबिर सर्वांसाठी विनामूल्य असेल.

शिबिराचा तपशील:
दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी, दुपारी २ ते ४ या वेळेत वणी येथील वसंत जिनींग हॉल येथे हे शिबिर संपन्न होणार आहे.

संस्थेचा परिचय आणि उद्देश:
‘तेजज्ञान फाउंडेशन’ ही पुणे येथील एक नामांकित आध्यात्मिक संस्था असून, ती संपूर्ण विश्वात ‘हॅपी थॉट्स’ (Happy Thoughts) या नावाने ओळखली जाते. संपूर्ण विश्वात शांतता नांदावी आणि मानवी जीवनातील प्रत्येक मूल्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या संस्थेचा एकमेव उद्देश आहे. वणी येथील शाखेने लोकांच्या आरोग्यावर होणारा तणाव दूर करण्यासाठी एका सखोल संशोधनाद्वारे या शिबिराची आखणी केली आहे.
यांना दिले निमंत्रण:
या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी वणी परिसरातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि महिला भगिनींना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
आयोजक व आवाहन:
वणीकर जनतेने मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्रमुख सतिश पिंपळे, अनिल अग्रवाल, दिलीप अग्रवाल, रामजी महाकुलकर, पुंडलिक जोगी, संजय विहितकर, विशाल खांदनकर, नितेश बावणे आणि निरंजन खाडे यांनी केले आहे

























