HomeAgroवेकोलीच्या मनमानी कारभाराविरोधात कोळगाव चेकपोस्ट वर ९ जुलै रोजी 'रस्ता रोको' आंदोलन;...

वेकोलीच्या मनमानी कारभाराविरोधात कोळगाव चेकपोस्ट वर ९ जुलै रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलन; माजी जि.प. सदस्य विजय पिदुरकर यांचा इशारा!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…

वेकोली वणी एरिया अंतर्गत येणाऱ्या कोळगाव-मुंगोली कोळसा खाणींमुळे परिसरातील नागरिकांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही वेकोली प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने, लोकशाही मार्गाने ९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता कोळगाव चेक पोस्ट जवळ तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

या संदर्भात माजी जि.प. सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली मा. उपविभागीय अधिकारी (महसूल विभाग, वणी) यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. या आंदोलनाला स्थानिक लोकप्रतिनिधी, कोळगावच्या ग्रामपंचायत प्रशासक सौ. शुभांगी संदीप जेणेकर, साखराचे ग्रा.पं. सदस्य श्री. निखिल उपासे, आणि शिवणी (जा.) चे ग्रा.पं. सदस्य श्री. विश्वास बोरपे यांच्यासह स्थानिक नागरिकांचा थेट पाठिंबा व प्रत्यक्ष सहभाग असणार आहे.

वेकोलीच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त…

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मुंगोली-कोळगाव कोळसा खाण उत्खनन आणि अवजड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. विना टार्पोलिंग होणारी कोळसा वाहतूक, प्रलंबित जमीन अधिग्रहण, प्रकल्पग्रस्तांना कंत्राटी कामात रोजगार न मिळणे, प्रदूषण आणि सांडपाण्याची समस्या यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांचे जीणे असह्य झाले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन काहींना अपंगत्व आले आहे, तर काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वेकोली केवळ आर्थिक फायद्यासाठी कोळसा उत्पादनावर लक्ष केंद्रित करत असून, नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पिदुरकर यांनी केला आहे.

प्रमुख १२ मागण्यांसाठी एल्गार:

आंदोलकांकडून प्रशासनासमोर खालील प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत:

१. प्रमुख जिल्हा मार्ग कोळगाव चेक पोस्ट ते कोळगाव फाटा पर्यंतच्या नादुरुस्त रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे.

२. कोळगाव पुनर्वसन ते जोड रस्ता दुरुस्त करणे.

३. कोळगाव फाटा ते भीमनगर मुंगोली रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करणे.

४. मुंगोली-कोळगाव कंत्राटी कामात बेरोजगार स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य देणे.

५. मुंगोली-शिवणी रस्त्यावरील पुलाचे पिचिंग करणे व शिवणी गावापर्यंत १०० मीटर रस्ता मजबूत करणे.

६. साखरा ते रेल्वे अंडर पास १७ दरम्यानच्या रस्त्यावर पाणी मारून धूळ नियंत्रित करणे.

७. कोळगाव पैनगंगा पूल साखरा ते मुंगोली पूल नागरिकांसाठी सुरक्षित व स्वतंत्र रस्ता तयार करणे.

८. साखरा ते रेल्वे अंडर पास १७ दरम्यान मुख्य रस्त्यावर गतिरोधक, स्ट्रीटलाईट आणि रेडियम पोल लावणे.

९. वर्धा नदीवरील नवीन मुंगोली पुलावर स्ट्रीटलाईट लावणे.

१०. कोळगाव-मुंगोली खाण परिसरात पर्यावरणास घातक ठरलेली ‘प्रोसीफिस बाभूळ’ समूळ नष्ट करणे.

११. पैनगंगा मुंगोली खाणीतील कोळसा वाहनांसाठी सुरक्षित पार्किंग व्यवस्था निर्माण करणे.

१२. मुंगोली पुनर्वसन येथील प्रकल्पग्रस्तांचे गट नं. ४६, ४८ शिवणी चिंचोली अधिग्रहणात सामावून घेणे.

याशिवाय साखरा रेल्वे अंडरपास, कैलासनगर, मुंगोली चेकपोस्ट आणि शिवणी येथे स्ट्रीटलाईट लावणे व साचलेला चिखल-पाणी साफ करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

…तर आंदोलन सुरूच राहणार!

“जोपर्यंत या न्याय्य आणि रास्त मागण्यांसंदर्भात वेकोली प्रशासन व महसूल विभाग ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत ९ जुलै रोजी होणारे रस्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा इशारा विजय पिदुरकर आणि स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यवतमाळ, महाप्रबंधक वेकोली (वणी एरिया), उपविभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग, वणी), आणि पोलीस निरीक्षक (शिरपूर) यांना माहिती व योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए