मा रवींद्र चव्हाण, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश, मा देवंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि मा प्रफुल भाऊ चव्हाण, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्हा, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा यांचे सूचनेनुसार गुरुपौर्णिमा निमित्त भारतीय जनता पार्टी वणी शहर च्या वतीने वणी शहरातील गुरुवर्य संस्कृत पंडित मा स्वानंद पुंड सर, जैताई माता मंदिर चे सर्वेसर्वा श्री माधव सरपटवार सर, प्रसिद्ध कीर्तनकार मा मुन्ना महाराज तुगनायक, योग शिक्षक मा महादेवराव खाडे सर यांचे घरी जाऊन त्यांची शाल श्रीफळ देऊन गुरु पूजा करण्यात आली. तसेच प्रसिद्ध तबला वादक स्वर्गीय कुचनकार सर यांचे घरी जाऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.


या प्रसंगी माजी आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार, एड निलेश माया महादेव चौधरी, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वणी शहर, जेष्ठ नेते श्री संतोषभाऊ डंभारे, श्री साखरकर सर, श्री बालाजी भेढोडकर, श्री हितेन अटारा, श्री मयूर गोयनका आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

























