वणीतील प्राचीन अश्या शेषषायी भगवान विष्णूच्या रंगनाथ स्वामी मंदिरात श्रावण मासानिमित्य विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे व अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे…
याच अनुषंगाने
दिनांक २६,२७,२८ जुलैला प्रसिद्ध भागवताचार्य श्री बबन महाराज देव कोंडोलीकर यांचा ज्ञानेश्वरी वरील प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे,बबन महाराज देव कोंडोलीकर यांना वणीतील अनेकजण गुरूस्थानी मानतात.
बबन महाराज देव यांच्या रसाळ व मधुर वाणीतून या प्रवचनपर कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री रंगनाथ स्वामी देवस्थान समितीने केले आहे…
या कार्यक्रमा व्यतिरिक्त पूर्ण श्रावण मासात अनेक धार्मिक कार्यक्रमांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे परिसरातील वातावरणात अध्यात्मिक सुगंध दरवळेल यात शंका नाही…

पवित्र श्रावण मासात या देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते, श्री रंगनाथ स्वामी यांना वणीचे ग्रामदैवत म्हटले जाते,हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून या मंदिराचा प्राचीन इतिहास आहे…


वणीतील






















